पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ‘लोगो’ तयार झाला असून लवकरच त्याचे अनावर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून ‘लोगो’ तयार झालेला नव्हता. एखादी संस्था किंवा कार्यालय असेल तर त्याची ओळख होण्यासाठी बोधचिन्ह (लोगो) महत्वाचे ठरते. सरकारी कार्यलयातही याचा महत्वाचा वाटा आहे. लोगो हा त्या वास्तूची, संस्थेची एक महत्वाची ओळख होती.
स्वतंत्र पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय झाल्यानंतर प्रथम आयुक्तांसमोर अनेक समस्या आणि अडचणी होत्या. यातील प्राथमिक गरजा आणि समस्या सोडविण्यासाठी तत्कालिन पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी प्रयत्न केले आणि त्या सुटल्या ही. आजही अनेक समस्या आणि अडचणी आहेत त्या सोडविण्यासाठी नवीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत.
याचाच एक महत्वाचा भाग म्हणजे नवीन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ‘लोगो’ आहे. हा लोगो तयार झाला आहे. या ‘लोगो’चे उद्घाटन एका कार्यक्रमात करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा ‘लोगो’ जवळपास फायनल झाला असून लवकरच त्याचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिली.
Visit : Policenama.com
- सावधान ! गरम-गरम चहा पिण्याची सवय पडू शकते महागात, ‘हे’ आहेत ३ धोके
- दाट केसांसाठी बहुगुणी आहे आवळा, होतील ‘हे’ ६ फायदे
- सावधान ! ‘या’ ५ गोष्टी वॉशरूममध्ये घेऊन जाऊ नका, जाणून घ्या
- बाळंतपणानंतरचे वजन कमी करायचे आहे का ? ‘हे’ ७ उपाय करा
- अपचन, कंबरदुखी, आणि नैराश्यावर ‘हा’ एकच उपाय, हे आहेत ५ फायदे
- उपवास केल्याने होतात हे १४ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- ‘हे’ असू शकते जुनाट आजाराचे मूळ, वेळीच लक्ष देऊन करा हे उपाय