सराईत गुन्हेगारांकडून तीन लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून तीन लाख सहा हजार ११५ रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला आहे. यामध्ये सिगारेट बॉक्स, तीन दुचाकीचा समावेश आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पोलिसांनी केली आहे.

निलेश मोहन गायकवाड (३०, रा. विद्यानगर, चिंचवड), ईश्वर संजय पवार (१९, रा. भीमशक्तीनगर, साने चौक, चिखली) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन मोटरसायकल, सहा गॅस सिलेंडर व सिगारेटचे बॉक्स असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या दोघांकडून पिंपरी, चिखली, भोसरी, खोपोली, बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, रविंद्र राठोड, अमित गायकवाड आणि त्यांच्या पथकाने केली आहे

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/