पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही का?

पिंपरी-चिंचवड : पोलीसनामा आॅनलाईन

कृष्णा पांचाळ

पिंपरी-चिंचवड पोलिसांना सध्या वेगळ्या मनस्थितीतून जावं लागत असल्याचे समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना धक्का बुक्की,गोळ्या घालण्याच्या धमक्या,शिवीगाळ अश्या घटनांसह एका दुचाकी चालकाने वाहतूक पोलिसाला कानशिलात देखील लगावल्याची घटना घडली आहे. यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याचं स्पष्ट होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात आयुक्तालय झाले असते तर गुन्हेगारांवर वाचक राहिला असता असे बोलले जात होते . परंतु सरकार कडून आयुक्तलयासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे.

निगडीच्या भक्तीशक्ती चौकात वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत खाली पाडल्याची घटना ३ मे रोजी समोर आली होती.संबंधित अधिकाऱ्याने निगडी पोलिसात तक्रार दिली होती.उमेश नानासाहेब लोंढे अस धक्काबुकी झालेल्या वाहतूक पोलीस सहाय्यक निरीक्षकाचे नाव आहे.याप्रकरणी आरोपी जयप्रकाश राम धनंजय याला निगडी पोलिसांनि अटक केली होती.
२९ एप्रिल रोजी वाकड येथे कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिसाला दुचाकी चालकाने कानशिलात लगावली होती.याप्रकरणी वाहतूक पोलीस तेजलाल हिरामण भालेराव यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद दिली होती.त्यानुसार संशयित आरोपी सुरज गोविंद परळकर वय-२८ याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.दिनांक १८ एप्रिल रोजी सांगवी मधील पोलीस शिपाई एस.एस सकट यांना अश्लील शिवीगाळ करत धक्काबुकी केल्याचा प्रकार समोर आला होत.याप्रकरणी तिघांना सांगवी पोलिसांनी अटक केले.विक्की विद्यासागर पुटगे वय-२५ आणि रोहित विद्यासागर पुटगे वय-२१आणि प्रकाश राजू वाघमारे वय- २८ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे होती.यातील एका आरोपीने ‘मला तू कोण विचारणारा असे पोलीस मी खूप पाहिले आहेत.तुला काय करायचं ते कर मी कोणाला घाबरत नाही अस म्हणत धमकी दिली होती.

त्याचबरोबर १७ एप्रिल रोजी हिंजवडी ग्रामपंचायत सदस्याने पोलीस शिपाईला गोळी घालण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. यात ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत होतं.हिंजवडी मधील एका हॉटेल समोर भांडण सुरू असल्याचे शंभर नंबर वर फोन आला होता.कंट्रोल रूम ने हिंजवडी पोलिसांना याची माहिती देताच. ड्युटी वर असलेले पोलीस शिपाई मोहन दळवी यांनी घटनास्थळ गाठलं.तेंव्हा तेथील व्यक्तींनी “तू इथे कश्याला आला आहेस, तुम्हाला गोळ्या घालीन” असं म्हणत दळवी यांनी ढकलून दिले होते. याप्रकरणी दळवी यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्यांना अटक केली होती. या घटना एप्रिल महिन्यात घडल्या आहेत,एकीकडे पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहन तोडफोडीच्या सत्र सुरू आहे,त्यात आता पोलिसांनाच धमकावणे,धक्काबुक्की,मारहाण अश्या प्रकारात वाढ झाली आहे.त्यामुळे पोलिसांची आणखीनच डोके दुःखी वाढली आहे.अश्यात नागरिकांची सुरक्षा मात्र आता राम भरोसे आहे असेच म्हणावे लागेल.