Pimpri Chinchwad Police | चाकण जवळ टेम्पोतून १ कोटींचा गुटखा हस्तगत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police | पुणे – नाशिक महामार्गावरील (Pune-Nashik Highway) वाकी गावाजवळ चाकण पोलिसांनी (Chakan Police) एका टेम्पोमधून तब्बल १ कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे. याप्रकरणी टेम्पोचालक गणेश विठ्ठल भाडळे (वय ३२, रा. कोयाळी, भाडळेवस्ती, ता. खेड, जि. पुणे) याला अटक केली आहे.

 

याप्रकरणी पोलीस नाईक भैरोबा यादव यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १११५/२२) दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक निलेश चव्हाण यांना बातमीदाराकडून टेम्पोतून गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने नाशिक पुणे महामार्गावर वाकी परिसरातील रोहकल फाट्यावरील स्पीड ब्रेकरवर सापळा रचला होता. (Pimpri Chinchwad Police)

 

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ७ वाजता पांढर्‍या रंगाचा टेम्पो आला. स्पीड ब्रेकरजवळ टेम्पोचा वेग कमी झाल्याबरोबर पोलिसांनी टेम्पोचालकाला टेम्पो बाजूला घेण्यास सांगितले. टेम्पोमधील मालाची तपासणी केली असताना त्यात आरएमडी पान मसाला असलेल्या गोण्या व एम सँटेंड टोबको असलेला गुटखा असा ९१ लाख १२ हजार रुपयांचा माल आढळून आला. पोलिसांनी टेम्पोसह १ कोटी १ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. टेम्पोचालक गणेश भाडळे याच्याकडे चौकशी केल्यावर हा माल सुरज याचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सुरज याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

 

 

Web Title :- Pimpri Chinchwad Police | Gutka worth Rs 1 crore seized from Tempo near Chakan pimpri chinchwad police

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा