Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्तांचा जनता दरबार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील (Pimpri-Chinchwad Police) परिमंडळ दोन मधिल प्रत्येक पोलीस ठाण्यात (police station) पोलीस उपायुक्तांचा (Deputy Commissioner of Police) जनता दरबार (Janata Darbar) होणार आहे. पोलीस उपायुक्त प्रत्येक पोलीस ठाण्यात (every police station) जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलीस उपायुक्त कार्यालयात न जाता पोलीस ठाण्यात जनता दरबारमध्ये ( Janata Darbar ) आपल्या तक्रारी मांडता येणार आहे. हा जनता दरबार प्रत्येक आठवड्याला होणार आहे.

 

परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे (Deputy Commissioner of Police Anand Bhoite) यांनी या संदर्भात माहिती दिताना सांगितले की, 17 जुलै रोजी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांना काही सूचना दिल्या होत्या. यामध्ये प्रत्येक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने (senior police officer) प्रत्येक पोलीस ठाण्यात जनता दरबार घेण्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (Commissioner of Police Krishna Prakash) यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ दोन मधील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर आठवड्याला जनता दरबार घेतला जाणार आहे.

 

परिमंडळ दोन मधील प्रत्येक पोलीस स्टेशनला ठरावीक वार ठरवून दिला आहे. सकाळी 11 ते 2 या वेळेत जनता दरबार होणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निरसन पोलीस ठाण्याच्या स्तरावर न झाल्यास ते थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात येतात. आता अशा नागरिकांच्या तक्रारीचे निरसन पोलीस स्टेशन स्तरावर होणार आहे. ज्या नागरिकांच्या तक्रारी असतील त्यांनी आपल्या तक्रारी जनता दराबारामध्ये मांडाव्यात असे आवाहन पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी केले आहे.

 

या दिवशी होणार जनता दरबार

1. सोमवार – सांगवी पोलीस स्टेशन

2. मंगळवार – तळेगाव दाभाडे, तळेगाव एमआयडीसी व शिरगांव पोलीस चौकी यांचा जनता दरबार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये होईल.

3. बुधवार – देहुरोड पोलीस स्टेशन, रावेत पोलीस चौकी यांचा जनता दरबार देहुरोड पोलीस ठाण्यात होईल.

4. गुरुवार – चिखली पोलीस स्टेशन

5. शुक्रवार- हिंजवडी पोलीस स्टेशन

6. शनिवार – वाकड पोलीस स्टेशन

Web Tital : Pimpri Chinchwad Police | Janata Darbar of Deputy Commissioner of Police in every police station of Pimpri-Chinchwad Commissionerate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update