Pimpri-Chinchwad Police News | परदेशी तरुणींकडून करून घेतलं जात होतं ‘हे’ काम; पोलिसांनी खासगी घरावर छापा टाकून केला पर्दाफाश

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – Pimpri-Chinchwad Police News | खासगी फ्लॅटमध्ये परदेशी तरुणींना ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय केला जात असल्याचा प्रकार सामाजिक सुरक्षा पथकाने उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri-Chinchwad Police ) कुंटणखाना चालविणार्‍या निलेश नरेश गोस्वामी (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) याला अटक केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल विलासराव सोळंके यांनी सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. सांगवीतील सृष्टी चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालयाकडे जाणार्‍या रोडवरील शिव मल्हार या बिल्डिंगच्या दुसर्‍या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर काल दुपारी येथे छापा घातला. तेव्हा तेथे चार परदेशी तरुणी आढळून आल्या. त्यांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला जात असल्याचे दिसून आले. पोलिसांनी निलेश गोस्वामी याला अटक करुन त्यांच्याकडून ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : Pimpri-Chinchwad Police News arrest nilesh goswami in prostitute case

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार,
पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या

Modi Cabinet Expansion | मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता भाजप संघटनेतही होणार बदल; प्रकाश जावडेकर, ‘या’ दिग्गजांना मिळणार महत्त्वाची जबाबदारी