Pimpri Chinchwad Police News | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला हिंजवडी पोलिसांकडून अटक, 1 पिस्टल 1 काडतुस जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police News | विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या एका तरुणाला हिंजवडी पोलिसांनी (PCPC Police) अटक केली आहे. अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल, एक जिवंत काडतुस (Cartridge), दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि.20) हिंजवडी ते कासारसाई कडे जाणाऱ्या रोडवर दुपारी दोनच्या सुमारास करण्यात आली.(Pimpri Chinchwad Police News)

सचिन गिन्यानदेव पवार (वय-19 रा. माळीमळा, सनसवाडी, ता. शिरुर, मुळ रा. पाचेगाव वसंतनगर तांडा, ता. गेवराई, जि. बीड) याच्यावर आर्म अॅक्ट (Arm Act) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक नरेश आनंदराव बलसाने ASI Naresh Anandrao Balsane (वय-51) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्य़ाद दिली आहे. (Pimpri Chinchwad Police News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी ते कासारसाई कडे जाणाऱ्या रोडवर पर्पल बिल्डरच्या मोकळ्या जागेत
एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा
रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 30 हजार रुपये किमतीचे गावठी लोखंडी
पिस्टल आणि 500 रुपयांचे एक जिवंत काडतुस सापडले. पोलिसांनी पिस्टल, काडतुस आणि दुचाकी असा एकूण
50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोमारे (API Gomare) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrakant Patil | बेरोजगार तरुणाने पत्रकारांमध्ये शिरून चंद्रकांत पाटीलांना विचारला प्रश्न, पण शंका येताच….

Pimpri Chinchwad Police News | ‘हॉटेल सांबार’ फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

विभागीय आयुक्तांकडून तडीपारीचा आदेश रद्द

NCP Chief Sharad Pawar | १४३ खासदारांचं निलंबन का झालं? शरद पवारांनी सांगितलं कारवाई मागचं कारण