पिंपरी-चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांना खटारे वाहने

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्तालय अनेक समस्याने ग्रासलेले आहे. अद्याप पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही तर हद्दीत गस्त घालण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली वाहने खटारा असून कुठेही आणि कधीही बंद पडतात. याचा फटका पोलीस उपयुक्तांनाही बसला आहे. याच आयुक्तल्याच्या शेजारील पुणे पोलिस आयुक्तांच्या ताफ्यामध्ये ८६६ वाहने असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी फक्त ४४ वाहने आहेत. यावरून शासनाकडून नवीन पोलिस आयुक्तालयावर भेदभाव केला जात असल्याची टीका होत आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d4bc31f5-cb22-11e8-ab8f-9fdf40246eaa’]

पुणे शहर आणि जिल्हा (ग्रामीण) पोलीस ठाणे यांचे विभाजन करून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. १५ ऑगस्टपासून चिंचवडच्या ऑटो क्लस्टरच्या इमारतीमधून आयुक्तालयाचे काम सुरू आहे. अनेख समस्या असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरात शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन प्रयत्न करत आहेत.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da85fa6e-cb22-11e8-a00b-893ba23aa468′]

पुणे शहर आणि पुणे ग्रामीण यांनी पोलीस ठाणे स्थापण झाली त्यावेळी मंजूर मनुष्यबळ दिले आहे. नवीन पोलीस आयुक्तांना मनुष्यबळासह वाहनांची मोठी समस्या जाणवत आहे. १५ पोलिस ठाण्याचे अधिकारी, गुन्हे शाखेचे अधिकारी, सहायक आयुक्त, उपायुक्त, अप्पर पोलीस आयुक्त, आयुक्त या सर्वांना फक्त ४४ वाहने देण्यात आली आहेत. ही वाहने चार चार लाख रनिंग झालेली आहेत. गुन्हेगाराच्या वाहनामागे एक किलोमीटरही पाठलाग करू न शकणारी वाहने देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने कधीही आणि कुठेही बंद पडू शकतात अशी आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या ‘त्या’ भाजप नगरसेवकाला न्यायालयाची नाेटीस

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like