Pimpri Chinchwad Police | पिंपरी-चिंचवड पोलिसांचा आळंदी, चाकण परिसरातील दारु भट्टीवर छापा, 15 लाखांचा मुद्देमाल नष्ट

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Chinchwad Police | पिंपरी चिंचवड पोलिसांनी परिसरात असणाऱ्या अवैध दारुभट्टीवर कारवाई केली जात आहे. चाकण आणि आळंदी परिसरात केलेल्या कारवाईत तब्बल 15 लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करुन तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. ही कारवाई आळंदी परिसरातील मरकळ आणि चाकण परिसरातील वाकी खुर्द येथे करण्यात आली.(Pimpri Chinchwad Police)

चाकण पोलिसांनी वाकी खुर्द गावच्या हद्दीतील घोडदरी येथील भामानदीच्या काठालगत असलेल्या मोकळ्या जागेत गावठी हातभट्टीवर छापा मारुन कारवाई केली. यामध्ये दारु तयार करण्यासाठी लागणारे कच्चे रसायन आणि तयार दारु असा एकुण 10 लाख 50 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास करण्यात आली.

या कारवाईत आदित्य रघु कुंभार (वय-19), अजय रघु कुंभार (वय-25 दोघे रा. रोहकल रोड, चाकण) यांच्यावर आयपीसी 328, 34 सह महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस शिपाई अशोक मारुती दिवटे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. आरोपींनी एका खड्ड्यात गुळ, नवसागर, तुरटी, प्लास्टिक पिशव्या, पोत्याचा बारदाना टाकून 50 हजार लिटर कच्चे रसायन रापत ठेवले होते. तसेच आरोपींनी सात हजार लिटर दारू तयार केली होती. पोलिसांनी रसायन व तयार दारु नष्ट केली.

मरकळ येथे दारू भट्टीवर पोलिसांचा छापा

आळंदी : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकळ येथे दारु भट्टीवर पोलिसांनी छापा मारुन 4 लाख 58 हजार 500
रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 14) मध्यरात्री पावणे दोन वाजता करण्यात आली.
पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी राजू छोटेलाल पटेल (वय 41, रा. डुडुळगाव, ता. हवेली) अंधाराचा फायदा
घेऊन पळून गेला. याप्रकरणी पोलीस शिपाई बाळासाहेब विष्णु खेडकर यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police MCOCA Action | वारजे माळवाडी परिसरातील हेमंत उर्फ विकी काळे टोळीवर ‘मोक्का’! पुणे पोलिसांची चालु वर्षातील 17 वी कारवाई