Pimpri Chinchwad Police Recruitment | पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस भरती परीक्षेत पोलिसांमुळे ‘मुन्नाभाई’चा प्लान फसला

पुणे / पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पोलीस शिपाई पदासाठी (Pimpri Chinchwad Police Recruitment) आज (शुक्रवार) लेखी परीक्षा घेण्यात आली. 790 जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. पोलीस भरतीची (Pimpri Chinchwad Police Recruitment) परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी व गैरप्रकार रोखण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, व्हिडिओ शूटिंग व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके नेमण्यात आली होती. मात्र हिंजवडी येथील परीक्षा केंद्रावर (Hinjewadi Examination Center) गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एका ‘मुन्नाभाई’चा (Munna Bhai) प्लान फसला. आरोपीने पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी चक्क मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस (Electronic device) बसवले होते.

 

पिंपरी चिंचवड आयुक्तालयांतर्गत 790 जागांसाठी ही प्रक्रिया राबविण्यात आली. त्या अंतर्गत आज दुपारी तीन ते साडे चार या वेळेत लेखी परीक्षा (Pimpri Chinchwad Police Recruitment) घेण्यात आली. शहरातील 80 केंद्रावर परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. दुपारी हिंजवडी येथील केंद्रावर उमेदवारांची तपासणी सुरु होती. त्यावेळी आरोपी उमेदवाराच्या मास्कचे (Mask) वजन जास्त असल्याचे एका पोलिसाच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने मास्कची बारकाईने पाहणी केली असता आतमध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस बसवल्याचे समोर आले. त्यामध्ये एक सिमकार्ड मिळून आले आहे. पकडले गेल्यानंतर आरोपीने परीक्षा केंद्रावरुन पळ काढला असून त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई भरतीसाठी पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद
येथील 444 केंद्रावर 7 हजार 384 परीक्षा हॉलमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
या परीक्षेसाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त (Addi CP), 15 उपायुक्त (DCP), 25 सहायक पोलीस आयुक्त (ACP),
177 निरीक्षक (PI), 636 सहायक पोलीस निरीक्षक (API), 12 हजार 838 पोलीस उपनिरीक्षक कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

Web Title :- Pimpri Chinchwad Police Recruitment | police recruitment test munnabhai failed due to police vigilance in pimpri chinchwad Hinjewadi Examination Center

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Laxman Mane | ‘कंगना रणौत, विक्रम गोखले, अवधूत गुप्ते भाजपचे पपेट’ !; ‘या’ लेखकाची जोरदार टीका (व्हिडीओ)

Pune Crime | युवकाची शर्टच्या सहाय्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या; पुण्याच्या तळेगाव दाभाडेमध्ये प्रचंड खळबळ

Anil Parab | खासगीकरणावर अनिल परबांची माहिती; म्हणाले – ‘एसटी कामगारांसोबत लोकांचीही जबाबदारी राज्य सरकारवर’

Virat Kohli | डिव्हिलियर्सच्या निवृत्तीवर विराट कोहलीने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

CM Uddhav Thackeray | PM मोदींच्या घोषणेनंतर CM ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले – ‘सर्वसामान्यांची ताकद देशाला कळली’