Pimpri Chinchwad Police | मौजमजा करण्यासाठी कट रचून टाकला दरोडा, फिर्यादीच निघाला चोर ! पिस्टलसह 4.5 लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pimpri Chinchwad Police | सात लाख लुटल्याचा बनाव रचणाऱ्या ड्राव्हरला आणि त्याच्या इतर तीन मित्रांना पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Police) दरोडा विरोधी पथकाने (Anti-robbery squad) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून पिस्तूलासह (Pistol) साडे चार लाखांची रोकड जप्त केली आहे. 1 सप्टेंबर रोजी मुख्य आरोपी अभिषेक शिरसाट (Abhishek Shirsath) हा कामगारांच्या पगाराची 7 लाखाची रोकड घेऊन निघाला होता. तेव्हा, त्याच्या साथीदारांनी त्याला लुटले होते. मात्र, पोलीस तपासामध्ये हा बनाव असल्याचे समोर आले.

मुख्य आरोपी अभिषेक शिरसाट, यश गणेश आगवणे (वय-19 रा. रुपीनगर, तळवडे), कासीम मौला मुर्शीद (वय-21 रा. ओटास्किम, निगडी), सागर आदिनाथ पवार (वय-18 रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, निगडी)
असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली.
पोलिसांनी आरोपी यश आगवणे याच्याकडून 50 हजार, मोबाईल, कासीद मुर्शीद याच्याकडून दीड लाख, गावठी पिस्टल, मोबाईल तसेच सागर पवार याच्याकडून 65 हजार, सागर पवार याच्याकडून 2 लाख 65 हजार असा एकूण 4 लाख 45 हजार रुपयांची रोकड आणि दुचाकी जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मौजमजा करण्यासाठी 7 लाख रुपये लुटले होते. 1 सप्टेंबर रोजी रात्री 9 च्या सुमारास आरोपी अभिषेक शिरसाठ हा कामगारांचे पेमेंट घेऊन जात असताना.
त्याचा अज्ञात पाच जणांनी पाठलाग करुन व मारहाण करत त्यांच्याजवळील 7 लाख रुपयांची रोख रक्कम लुटले.

पोलिसांनी तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे (PSI Mangesh Bhange),
पोलीस नाईक आशिष बनकर (Ashish Bankar) यांना माहिती समजली की, तीन संशयीत आरोपी हे चिखली येथे थांबले आहेत.
पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस चौकशीत फिर्यादी ड्रायव्हर अभिषेक शिरसाठ हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.

 

आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपींवर कर्ज होते.
तसेच मौजमजा करण्यासाठी त्यांना पैशाची गरज होती.
शिरसाठ याने आरोपींना पैशाची माहिती दिली. ठरल्याप्रमाणे शिरसाठ यांच्याकडून आरोपींनी पैसे लुटले. लुटलेल्या पैशामधून 4 लाखाची रक्कम अभिषेक शिरसाठ याला मिळणार होती.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश (CP Krishna Prakash), अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Additional Commissioner of Police Sanjay Shinde), पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ
(DCP Sudhir Hiremath), सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amrutkar) यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे
(Senior Inspector of Police Uttam Tangde), सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे (API Siddheshwar Kailase), पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस अंमलदार आशिष बनकर, नितीन लोखंडे, महेश खांडे, राहुल खारगे, उमेश पुलगम, राजेंद्र शिंदे, विक्रांत गायकवाड, गणेश कोकणे, प्रविण कांबळे, प्रविण माने, सागर शेडगे, राजेश कोशल्ये, औदुंबर रोंगे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे नागेश माळी यांच्या पथकाने केली.

Web Title : Pimpri Chinchwad Police | Robbery hatched for fun, the plaintiff is the thief! 4.5 lakh with pistol seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Police Inspector Transfer | ‘लोणीकाळभोर’च्या निरीक्षकाची बदली, उत्तमनगर पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची नियुक्ती

Sharad Pawar | शरद पवारांनी केला ‘हा’ गंभीर आरोप; म्हणाले – ‘ईडीचा असा गैरवापर कधीच झाला नाही’

Cryptocurrency गुंतवणुकदारांसाठी मोठी बातमी ! कमोडिटीप्रमाणे असेल ‘ही’ करन्सी, कमाईवर लागणार Tax, लागू होतील नियम; जाणून घ्या