पिंपरी-चिंचवड पोलिसांचे लसीकरण सुरु ! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना पहिली लस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –   पिंपरी, चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलिसांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास मंगळवारी (ता. ९) सुरु करण्यात आले आहे. तर पहिली लस पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी घेतली तसेच दुसरी लस अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे याना देण्यात आली. पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यापासून या लसीकरणास सुरुवात करण्यात आली आहे.

कोरोना काळात सर्वच पोलीस रस्त्यावर उतरून कोरोना संकटाला लढा देत होते. कित्तेक पोलिसांना कोरोनाची लागण झाली. तर काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. सध्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असून. त्यामध्ये पोलिसांना लास देण्यात येत आहे. तसेच पिंपरी, चिंचवड पोलीस आयुक्तालयात सध्या ३ हजार पेक्षा अधिक पोलीस कार्यरत आहेत. तर चिचंवड येथील आयुक्तालयाच्या इमारतीमध्ये जम्बो लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी सर्व पोलिसांचे लसीकरण २ ते ३ दिवस सुरु राहणार आहे.

दरम्यान, आयुक्तलयातील १५ ठाणी गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, यासह अनेक विविध शाखा आणि अन्य विभागात कार्यरत असलेल्या सर्व पोलिसांना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे नियमानुसार लस दिली जाणार आहे.