Pimpri Chinchwad Police | ‘वडगाव मावळ’, ‘कामशेत’, ‘लोनावळा शहर’, ‘लोनावळा ग्रामीण’ आता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात समाविष्ट?, जाणून घ्या सविस्तर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन टीम – वेगाने विकसित होत असलेल्या आणि गुन्हेगारीने ग्रासलेल्या पिंपरी-चिंचवडमधील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करण्यात आले. सध्या या पोलीस आयुक्तालयामध्ये 15 पोलीस स्टेशनचा समावेश आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये वडगाव मावळ, कामशेत, लोनावळा शहर, लोनावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश Pimpri-Chinchwad Police Commissioner Krishna Prakash यांनी पोलीस महासंचालक Director General of Police यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर पोलीस महासंचालकांनी संबंधितांकडून तात्काळ अभिप्राय मागवला आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

FPO मधून 4300 कोटी रुपये जमवणार रामदेव यांची कंपनी, जाणून घ्या पूर्ण डिटेल

पिंपरी चिंचवड Pimpri Chinchwad Police पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रस्ताव सादर केला आहे.
पोलीस महासंचालकांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख Pune Rural Superintendent of Police Dr. Abhinav Deshmukh यांना संबंधित पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ग्रामपंचायतीकडून या संदर्भात अभिप्राय घेण्यास सांगितले आहे.
तसेच ग्रामसभेतील ठराव व त्यावरील ग्रामसभेचा निर्णय संबंधीत ग्रामपंचायतीकडून प्राप्त करुन कार्यालयास त्वरीत सादर करावा, असे निर्देश दिले आहेत.

Pune Corona : दिलासादायक ! पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 187 नवीन रुग्ण, 319 रुग्णांना डिस्चार्ज

सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये पिंपरी, चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली
तसेच पुणे ग्रामीणमधील चाकण, आळंदी, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी, देहुरोड
या पोलीस ठाण्याचा समावेश करण्यात आला आहे. वडगाव मावळ, कामशेत, लोनावळा शहर, लोनावळा ग्रामीण या पोलीस स्टेशनचा समावेश झाल्यानंतर आयुक्तालयाचा विस्तार होणार आहे.

Web Title : Pimpri Chinchwad Police wadgaon maval kamshet lonavla city lonavla gramin may be attach to pimpri chinchwad police commissioner office

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | खून का बदला खून ! ‘व्हॉट्सॲप’ स्टेटस ठेवून खून्नस दिल्याने केला निर्घृण ‘मर्डर’; भाच्याच्या खुनाचा बदला मामानं घेतला

Coronavirus : पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 158 नवीन रुग्ण, 713 जणांना डिस्चार्ज

Pune Crime News | पेट्रोल पंप मॅनेजरला भरदिवसा कोयता दाखवत पावणे नऊ लाख लुटले, वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा