पिंपरी: Pimpri Chinchwad Politics | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या (दि.४) मुदत आहे. त्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आला आहे. आज (दि.३) पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणूक बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाची (Shivsena Thackeray Group) बैठक बोलाविण्यात आली होती.
या बैठकीत मतदारसंघात झालेली बंडखोरी मागे घेण्याबाबत चर्चा सुरु होती. यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी नाराज पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. बंडखोरीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गट संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir), पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष ऍड. सचिन भोसले (Adv Sachin Bhosale) आणि संजोग वाघेरे (Sanjog Waghere) यांनी पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक एका बँकवेट हॉलमध्ये घेतली होती.
या बँकवेट हॉलमध्ये भोसरी विधानसभा (Bhosari Assembly Election 2024) क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक सुरू असताना जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही वेळ बैठकीत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. भोसरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचे बंडखोर पदाधिकारी रवी लांडगे (Ravi Landge) यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केला आहे.
तर पिंपरी विधानसभा क्षेत्रात (Pimpri Assembly Election 2024) शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार (Gautam Chabukswar) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. आता सचिन अहिर यांच्या शिष्टाईनंतर रवी लांडगे आणि गौतम चाबुकस्वार आपला अर्ज मागे घेऊन बंडखोरी टाळणार का? याची शहरात चर्चा आहे.