Pimpri Chinchwad Politics | पिंपरी चिंचवड मधील बंडखोरी रोखण्यास मविआला यश; रवी लांडगे अन् गौतम चाबुकस्वार यांची निवडणुकीतून माघार

Maharashtra Assembly Election 2024 | mahavikas aghadi mps praniti shinde and darishsheel mohite patil campaigned in pandharpur mangalvedha assembly

पुणे: Pimpri Chinchwad Politics | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु आहे. विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या (दि.४) मुदत आहे. त्यानंतर मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणूक बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेना (Shivsena Thackeray Group) संपर्कप्रमुख सचिन अहिर (Sachi Ahir) यांच्या उपस्थितीत आज (दि.३) शिवसेना ठाकरे गटाची बैठक बोलविण्यात आली होती. दरम्यान शहरातील दोन्ही अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याची माहिती आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातून बंडखोरी करणाऱ्या दोन उमेदवारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. यात पिंपरी विधानसभा मतदार संघातून (Pimpri Assembly Election 2024) शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार (Gautam Chabukswar) तर भोसरी विधानसभा (Bhosari Assembly Election 2024) मतदार संघातून रवी लांडगे (Ravi Landge) यांनी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातून माघार घेण्याची भूमिका घेऊन मविआच्या उमेदवारांचे काम करण्याची तयारी दर्शविली आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt) आल्यानंतर आज ज्यांनी त्याग केला त्यांची योग्य दखल घेतली जाईल, असे आश्वासन सचिन अहिर यांनी गौतम चाबुकस्वार आणि रवी लांडगे यांना दिले आहे.

पिंपरी विधानसभा क्षेत्रातून गौतम चाबुकस्वार हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक प्रबळ विधानसभा निवडणूक दावेदार होते तर भोसरी विधानसभा क्षेत्रातून रवी लांडगे हे एक प्रबळ दावेदार होते. मात्र आता दोन्ही दावेदारांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. अशी माहिती शिवसेना ठाकरे संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी आज (दि.३) पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

Total
0
Shares
Related Posts