Pimpri Chinchwad Rains | पिंपरी चिंचवडमधील काही भागात अतिवृष्टी; एका तासात 114 मिमी पावसाची नोंद (Video)

चिंचवड : Pimpri Chinchwad Rains | पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड, आकुर्डी, मोहननगर, संभाजीनगर, पूर्णानगर परिसरामध्ये रविवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले. पावसाने गटारी तुंबली आहेत. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

एका तासात ११४ मिमी पावसाची नोंद चिंचवडला झाली आहे. मान्सूनचे आगमन झाल्यांनतर काही दिवस पावसाने उघडीप दिली होती. रविवारी सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता. दुपारनंतर शहरातील विविध भागांमध्ये पावसाने आपली हजेरी लावली. (Pimpri Chinchwad Rains)

शहराच्या विविध भागांमध्ये पाऊस पडला. त्यामध्ये चिंचवड लिंक रोड, मोहननगर, स्पाईन रोड, पूर्णानगर,आकुर्डी परिसरामध्ये अतिवृष्टी झाल्याचे नागरिकांचे मत आहे. सायंकाळी साडेचार ते सव्वा पाच या वेळेत जोरदार पाऊस झाला.

त्यामुळे शहर परिसरातील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते.
पावसाळी गटारे तुंबल्याचे दिसून आले.
विविध भागांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याचेही नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनास कळविले होते.
त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विविध भागांमध्ये जाऊन पाणी काढण्यास मदत केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Nashik Highway Accident | ‘माझा पुतण्या पळून गेला नाही, त्यानं मद्यप्राशनही केलेलं नव्हतं’;
अपघातानंतर आमदार दिलीप मोहिते पाटलांचे स्पष्टीकरण

OBC Leader Laxman Hake | काही मागण्या पूर्ण काही बाकी; लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित

Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न (Video)