पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या संपूर्ण शहर कार्यकारिणीचा राजीनामा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्यानंतर आज पक्षात मोठा भूकंप झाला आहे. संपूर्ण शहर कार्यकारिणीने आजच्या बैठकीत सामुदायिक राजीनामे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सादर केले आहेत.

महिला प्रदेश काँग्रेसच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे, सेवादलाचे मुख्य संघटक संग्राम तावडे, प्रदेश एस.सी विभागाचे उपाध्यक्ष गौतम आरगडे, महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, युवक काँग्रेसचे नरेंद्र बनसोडे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, किशोर नेवाळे, लक्ष्मण रूपनार, बाळासाहेब साळुंके, परशुराम गुंजाळ, राजेंद्रसिंग वालिया, बिंदू तिवारी, विशाल कसबे, मयुर जैस्वाल, सज्जी वर्की या पदाधिकाऱ्यांनी आज प्रदेशाध्यक्षांकडे आपले सामुदायिक राजीनामे दिले आहेत.
[amazon_link asins=’B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0705c6f0-8363-11e8-aa6f-f3b9b0e1d46d’]

शहरात पक्षाकडून कोणत्याच प्रकारची ताकिद दिली जात नाही. कार्यकर्त्यांना बळ दिले जात नाही. पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी चिंचवडला दुय्यम वागणूक दिली जाते. या सगळ्यांवर नाराज होत शहराध्यक्ष सचिन साठे यांनी राजीनामा दिला. यांच्या समर्थनात आणि पक्षावर नाराज होऊन शहरातील 17 नेते, पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. या राजीनाम्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील काहीसे असणारे काँग्रेसचे अस्तित्व नाहीसे होण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या निवडणूका पाहता शहरात काँग्रेस पक्षाचे अवघड चित्र दिसत आहे.
[amazon_link asins=’B07F23BWLZ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7d35d1d6-8363-11e8-abb7-31415ee57a61′]