Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये ‘नियंत्रण’ ! 8 दिवसात एकही नवा रूग्ण नाही, आज 5 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त

पिंपरी चिंचवड, पोलीसनामा ऑनलाइन- महाराष्ट्रात एकीकडे कोरोनाच्या संख्येत वाढ होत असताना, पिंपरी-चिंचवड मधून एक दिलासा देणारी बातमी आली आहे.गेल्या ८ दिवसांमध्ये पिंपरी-चिंचवड परिसरात एकही रुग्ण आढळला नसल्याचे प्रशासनच्या वतीने सांगण्यात आले.तर तेथील आणखी ५ नागरिकांनी कोरोना विरोधात आपला लढा यशस्वी केल्याने त्यांना आता रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दरम्यान, आज 5 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त झाले आहेत.

पिंपरीतील एकाच कुटंबातील चार कुटुंबतील चार जणांना कोरोची लागण झाल्याचे १४ मार्च रोजी समोर आले होते. यामध्ये दोन महिला,१२ वर्षीय एक मुलगी आणि एक मुलगा आहे.तर एका थायलंड येथून परतलेल्या तरुणाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. या पाच जणांवर पिंपरीतील भोसरी येथील नूतन रुग्णालयात १४ दिवस उपचार सुरु होते. त्यानंतर त्यांच्या दोन वेळा कोरोनाच्या टेस्ट करण्यात आल्या दोन्ही टेस्टचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पाच ही रुग्ण कोरोनमुक्त झाल्याचे स्पष्ट झाले.आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आले असून, पाचही जणांना पुढील १४ दिवस होम क्वॉरंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे. शहरातील १२ कोरोना संसर्गित रुग्णांपैकी ८ जणांवरती यशस्वी उपचार करण्यात आले आहे.तर ४ जणांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

महाराष्ट्रात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या १९३ वर गेली असून,सर्वाधिक १०८ रुग्ण मुंबईत आहे.तर कोरोनामुळे महाराष्ट्रात ७ जणांचा मृत्यू देखील झाला आहे.

आणखी पाच रुग्ण कोरोना मुक्त…

पिंपरी चिंचवड शहरातील ३ कोरोनाबाधित रुग्ण दोन दिवसांपूर्वी ठणठणीत बरे झाले होते. त्यानंतर आज पिंपरी चिंचवडमध्ये दिलासादायक वातावरण असून १४ मार्च रोजी दाखल केलेले ५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांचे दुसऱ्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात १२ मार्च रोजी कोरोनाचे पहिले तीन रुग्ण ‘पॉझिटीव्ह’ आढळले होते. त्यापाठोपाठ रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली. चार दिवसांत एकूण १२ रुग्ण कोरोना ‘पॉझिटीव्ह’ आढळल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर १४ दिवस उपचार घेतलेले रुग्ण ‘कोरोनामुक्त’ व्हायला सुरुवात झाली. त्यापैकी पहिले ३ रुग्ण शुक्रवारी ‘कोरोनामुक्त’ होत ठणठणीत झाले होते, त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी (दि.२९) आणखी पाच रुग्णांचे १४ दिवसांनंतरचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आल्याने त्यांना घरी सोडले आहे.

या रुग्णाच्या घशातील द्रावाचे नमुने दुस-यांदा तपासणीसाठी ‘एनआयव्हीकडे’ पाठविण्यात आले होते. या दुस-या तपासणीत देखील त्यांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. हे पाच रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ झाले आहेत. त्यामुळे या रुग्णांना आज घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असून आता केवळ ४ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.

दरम्यान, कोरोनाचे रुग्ण ठणठणीत होत असल्याने ही सर्वांत मोठी शहरवासीयांना दिलासा देणारी बाब मानली जात आहे. मागील आठ दिवसांपासून शहरात एकही नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरात आनंदाचे वातावरण आहे. शहरात कोरोनाचे नवीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळत नसले. तरी, नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडू नये. वारंवार हात धुवावेत. सूचनांचे पालन करावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने केले जात आहे.