Pimpri News : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील 5 निरीक्षकांच्या नियुक्त्या, दोघांची अंतर्गत बदली

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस दलात 5 नवीन पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच 2 निरीक्षकांची अतंर्गत बदली करण्यात आली आहे. सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांची बदली महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) च्या आदेशान रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याकडे पुन्हा वाकड विभागाची देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनील टोनपे यांची पिंपरी ठाण्यातून वाकड ठाण्यात (गुन्हे 2) तर रवींद्र जाधव यांची नियंत्रण कक्षेतून दिघी-आळंदी वाहतूक विभागात बदली करण्यात आली आहे.

नव्यानं दाखल झालेल्या 5 पोलीस निरीक्षकांच्या नेमणुका पुढीलप्रमाणे-

1) वनिता धुमाळ – आर्थिक गुन्हे शाखा
2) अनिल देवडे – चाकण (गुन्हे)
3) सोन्याबापू देशमुख – देहूरोड (गुन्हे)
4) भोजराज मिसाळ – पिंपरी (गुन्हे)
5) दशरथ वाघमोडे – म्हाळुंगे चौकी (गुन्हे)