धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये तरुणीच्या छातीवर अगरबत्तीचे चटके देउन केला ‘बलात्कार’

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या काळात भयंकर प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये घडला आहे. तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून छातीवर अगरबत्तीचे चटके देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापृकरणी राजेश पवारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आरोपीने तरुणीचे अश्लील फोटोही व्हायरल करण्याची धमकी दिली. जेव्हा तरुणी आरोपीला भेटण्यासाठी गेली तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला. बलात्कारादरम्यान त्याने तरुणीच्या छातीवर अगरबत्तीचे चटके दिले. तुझे टॉपलेस फोटो वडिलांना पाठवेन अशी धमकी त्याने तरुणीला दिली.

तरुणाने तिच्या हातापायवर जखम करून शिवीगाळ आणि मारहाण केली आहे. याबाबत तरुणीच्या जबाबावरुन वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन राजेशला ताब्यात घेतले आहे.