पिंपरी-चिंचवडच्या दोन नगरसेविका दहावीत उत्तीर्ण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

मार्च २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेत पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन महिला नगरसेविकांनी घवघवीत यश संपादन केले आहे. संसार सांभाळत आणि पालिकेतील कामकाज सांभाळून या दोन नगरसेविकांनी यश संपादन केले आहे. प्रभाग क्रमांक 13 च्या भाजप नगरसेविका व ‘फ’ क्षेत्रीय कार्यलयाच्या अध्यक्षा कमल घोलप आणि स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे.

कालच दहावी शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नगरसेविका कमल घोलप या 72 टक्के गुणांनी उर्तीण झाल्या तर ममता गायकवाड यांना 55 टक्के गुण मिळाले.

2017 च्या महापालिका निवडणुकीत महिला आरक्षण पडल्यामुळे पती आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पत्नीला पहिल्यांदाच रिंगणात उतवरलं. त्यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. विनायक यांनी स्थायीच्या खुर्चीवर बसण्याचा चंग बांधला होता. पण पत्नीचे शिक्षण आठवीच्या पुढे न झाल्यामुळे त्यांनी सतरा नंबर फॉर्म भरुन दहावीची थेट परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेचं वेळापत्रक आलं. दुसरीकडे मार्च महिन्यात स्थायी समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया सुरु झाली. यात पक्षाने ममता यांचं नाव पुढं केलं. इतर तीन सदस्यांमध्ये अध्यक्षपदाची चुरस लागली आणि त्या तिघांची नावं डावलत ममता यांच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडली.

काल दुपारी निकालाची प्रत हाती पडताच त्यांनी सर्व विषयांचे मार्क पाहिले. मराठी ३८, हिंदी ३९ या भाषा विषयात त्यांना कमी मार्क मिळाले. पण स्थायी समितीमध्ये काम करत असताना प्रत्येक कामांची गणत जमावावे लागते. ममता गायकवाड यांना गणित विषयात ५९ गुण पडले. गणीताचे गुण लक्षात घेता गायकवाड या स्थायी समितीचे ‘आर्थिक गणित’ योग्य पद्धतीने सोडवतील यात काही शंकाच नाही.

शाळा सोडल्यानंतर २१ वर्षांनी दिली परिक्षा

प्रभाग क्रमांक 13 च्या भाजप नगरसेविका व ‘फ’ क्षेत्रीय कार्यलयाच्या अध्यक्षा कमल घोलप यांनी २१ वर्षानंतर दहाविची परिक्षा दिली. या परिक्षेत त्यांनी घवघवीत यश मिळवले. या त्यांच्या यशाचे कौतून सर्वच स्तरातून होत आहे. घोलप यांनी दहाविच्या परिक्षेत ७२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.

महापालिकेतील रोजची कामे, प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवून उरलेल्या वेळेत त्यांनी अभ्यास केला. हे यश मिळवताना त्यांनी प्रभागातील कामे, घर, संसार संभाळून हे यश मिळवले. त्यांना उच्चशिक्षण घेण्याची इच्छा होती. परतू घरची परिस्थीती बेताची असल्याने त्यांच्या आई-वडीलांची त्यांचे लवकर लग्न करुन दिले. त्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या दो महिला नगरसेविकांनी मिळवलेले पाहता ज्यांनी त्यांच्या शिक्षणाचे भांडवल केले. शिक्षण कमी असल्याचे वेळोवेळी बोलून त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला त्यांची तोंडे कायमची बंद केली.