Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 107 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 105 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू (Pimpri Corona) झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार,
आज दिवसभरात शहरात 105 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 204 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 107 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 68 हजार 413 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 1095 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Pimpri Corona) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहरातील तीन रुग्णाच्या मृत्यूची तर नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,427 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 8,680 जणांचे लसीकरण

शुक्रवारी (दि.24) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 08 हजार 680 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 18 लाख 46 हजार 937 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 107 corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पुण्यातील पिसोळी-उंड्री रस्त्यावर भरधाव वेगात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यु

30 जूनपूर्वी निवृत्त कर्मचार्‍यांची Gratuity वाढून येणार, 1 लाखावरून 7 लाख रुपयांचा होईल फायदा

Rain in Maharashtra | राज्यात आगामी 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता