Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 109 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (मंगळवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या शंभरच्या जवळ आली आहे. परंतु कालच्या तुलनेत आज रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 109 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 109 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 632 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 100 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 69 हजार 168 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 761 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 3 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4434 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.28) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 26 हजार 957 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 19 लाख 14 हजार 114 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 109 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mayor Murlidhar Mohol | महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या आईनंही अनुभवलं सेल्फीचं जग; महापौरांची भावनिक प्रतिक्रिया, सेल्फी ‘Viral’

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 172 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Royal Enfield Bullet 350 | 15 हजार देऊन घरी घेऊन जा दमदार क्रूझर बाईक, इतका असेल मंथली EMI; जाणून घ्या