Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 113 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 73 हजार 745 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 078 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 69 हजार 246 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona)

 

शहरात 794 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली आहे. सध्या शहरामध्ये 794 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4436 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 20,145 जणांना लस
बुधवारी (दि.29) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 20 हजार 145 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 19 लाख 34 हजार 259 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title :- Pimpri Corona | 113 new patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | पुण्यातील ‘आरे’ वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांचे आदित्य ठाकरे यांना साकडे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,253 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Satara Black Magic Case | ‘ती’ मुलगी बालसुधारगृहात ! स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांना पुण्यातून अटक