Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 113 नवीन रुग्णांची नोंद, जाणून इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 113 नवीन रुग्ण (Pimpri-Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 67 हजार 168 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 79 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 61 हजार 840 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 952 अ‍ॅक्टिव्हि रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4376 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी (दि.15) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 19183 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 12 लाख 27 हजार 867 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 113 new patients of ‘Corona’ registered in Pimpri Chinchwad, knowing other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पानशेत धरणात कार बुडून पुण्याच्या शनिवार पेठेतील समृध्दी देशपांडेचा मृत्यू; पती आणि मुलगा थोडक्यात बचावले

Tanaji Sawant | ‘उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादामुळेच तुम्ही सत्तेत आहात, उजनीसुद्धा ओलांडू देणार नाही’ (व्हिडिओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी