Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 117 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन  पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या वाढली आहे तर बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या (active patient) संख्येत हळूहळू वाढ होत असल्याने थोडी चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 117 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 117 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 423 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 92 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 69 हजार 767 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरामध्ये सध्या 936 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Pimpri Corona) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात शहरातील दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णांच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
गेल्या 24 तासात शहरात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,451 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 9,961 जणांचे लसीकरण

बुधवारी (दि.06) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9 हजार 961 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 20 लाख 42 हजार 523 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 117 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | ॲमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटीचा ‘भ्रष्टाचार’ ! भाजपचा पर्दाफाश करा; काँग्रेसजनांनो एकदिलाने महापालिका निवडणूक लढवा – काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (Video)

Agra-Mumbai Highway | SUV गाडीचा भीषण अपघात, 3 पोलिसांसह चार ठार

ZP, Panchayat Samiti Election | माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना ‘धक्का’ ! नगरखेडा पंचायत समितीत भाजपचं ‘कमळ’ फुललं