Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 123 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 123 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 123 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 74 हजार 729 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 100 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 70 हजार 084 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजाराच्या आत आली आहे.
सध्या शहरामध्ये 917 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरातील 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4459 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 12,460 जणांना लस

शनिवारी (दि.9) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 12 हजार 460 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 20 लाख 65 हजार 833 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 123 new patients of Corona in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune MNS | अ‍ॅड. रुपाली पाटील यांची राज्याच्या महिला उपाध्यक्षपदावर वर्णी

Kotak Mahindra Bank Stock | कोटक महिंद्रा बँकेने 20 वर्षात बनवले करोडपती, अवघे 20 हजार रुपये झाले सुमारे 2 कोटी

Pune Crime | ‘मार्केटिंग’वाल्या 25 वर्षीय विवाहितेला पुणे स्टेशनजवळच्या लॉजवर नेलं, कोल्ड्रींकमधून गुंगीचं औषध देऊन ‘काम’ तमाम, व्हिडीओ अन् फोटो व्हायरलची धमकी