Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 144 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad Corona) आज (मंगळवार) 144 कोरोना बाधित रुग्णाची भर पडली आहे. त्यामुळे शहरातील कोरोना (Pimpri Corona) बाधित एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 68 हजार 477 इतकी झाली आहे. दरम्यान शहरामध्ये यापर्वी मृत्यू झालेल्या दोन रुग्णांच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. तर गेल्या 24 तासात शहरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 144 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्याचवेळी शहरामध्ये 127 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 63 हजार 102 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1245 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4390 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज शहरात 17,213 जणांचे लसीकरण

मंगळवारी (दि.24) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 17,213 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 13 लाख 52 हजार 927 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 144 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

New Labour Code | 1 ऑक्टोबरपासून बदलणार कामगार कायदा, इनहँड सॅलरीवर होणार परिणाम, 12 तास काम!

Anti-Corruption | इचलकरंजीत 3 लाखाच्या लाच प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनचा ट्रॅप

Karad Crime | वारुंजी येथे 2 वर्षांच्या बालकासह महिलेचा आढळला मृतदेह; परिसरात खळबळ