Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 150 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाच्या (Pimpri Corona) दैनंदिन रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दैनंदिन आढळणारी कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनातून बरे (Recover Patient) होत असलेल्यांच्या तुलनेत कमी जास्त आढळून येत आहे. गुरुवारी (दि.30) पिंपरी चिंचवड शहरामध्ये 83 रुग्ण आढळून आले होते. आज (शक्रवार) यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 150 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 137 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज  दिवसभरात शहरात 150 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 79 हजार 136 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 132 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 879 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Pimpri Corona)

 

शहरामध्ये सध्या 462 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून आहेत. यामध्ये होम क्वारंटाईनमध्ये 237 तर संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 225 रुग्ण आहेत. आज दिवसभरात शहराबाहेरील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 12 हजार 660 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरामध्ये 29 लाख 66 हजार 558 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title :- pimpri corona 150 patients diagnosed with corona in pimpri chinchwad in last 24 hours learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | अनैतिक संबंधाच्या कारणावरुन पुण्यात एकाची ‘गेम’ ! महिलेसह दोघे ‘गोत्यात’

Urfi Javed | विवाहापुर्वी शरीरसंबंध ठेवणं…, तुम्ही कधीच पाहिले नसेल हे उर्फी जावेदचे रूप

 

Nashik Crime | फक्त 6 हजार रूपयांच्या कारणावरून 22 वर्षीय तरूणीनं उचललं ‘हे’ पाऊल

 

Punit Balan Group | पहिली ‘पुनित बालन करंडक’ अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा ! पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी, ब्रिलीयंन्ट् स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत!

 

Pune Covid Vaccination Centres | 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी पुण्यात 40 लसीकरण केंद्र