Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 151 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) कोरोनाची दुसरी लाट (second wave) हळूहळू ओसरत आहे. शहरात आज नविन रुग्णांची (New patient) संख्या दोनशेच्या आत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 151 नवीन रुग्ण (Pimpri Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 151 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 63 हजार 150 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 57 हजार 738 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 1084 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1 हजार 084 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4328 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 3429 हजार जणांना लस

शुक्रवारी (दि.23) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 03 हजार 429 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 54 हजार 534 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 151 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, know other statistics

Pimpri Chinchwad Police | रावण टोळी प्रमुखाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या 6 सराईतांना अटक; पिस्तुल, काडतुस जप्त

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा केसमध्ये समोर आला शर्लिन चोपडाचा नवीन व्हिडिओ, केला धक्कादायक खुलासा (व्हिडीओ)

Varsha Gaikwad | शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा, यंदाही शाळेच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात