Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 155 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (बुधवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 155 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 155 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 72 हजार 008 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 101 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 265 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1059 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1059 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 18,661 जणांचे लसीकरण

बुधवारी (दि.15) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 18 हजार 661 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 16 लाख 80 हजार 246 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 155 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Bigg Boss Marathi | उषा नाडकर्णीं, किशोरी शहाणेनंतर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ‘या’ ज्येष्ठ अभिनेत्रीची एन्ट्री

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 4,364 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

PMC Parking | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित बारवकर यांच्या मागणीला यश ! महापालिका गणेशोत्सवासाठी मंडईतील वाहनतळ उद्यापासून सुरू करणार