Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 157 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (मंगळवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. मात्र अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजारांच्या वर गेल्याने. चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) 157 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 157 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 853 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 153 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 67 हजार 164 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1007 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 3 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4413 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि.14) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 15 हजार 215 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 16 लाख 61 हजार 585 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 157 new corona patients in Pimpri Chinchwa in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Barti Pune | बार्टीला नियमित निधी न दिल्यास भाजप तर्फे आंदोलनाचा इशारा; भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Nashik Crime | लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद, मग सुरु केला थेट नकली नोटांचा छापखाना; नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश

Menstruation Myths | मासिक पाळीसंबंधी ‘या’ अफवांवर आजही विश्वास ठेवतात लोक, जाणून घ्या ‘सत्य’