Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 173 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज (शुक्रवार) कोरोनाच्या (Pimpri Corona) नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) 173 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 173 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 69 हजार 002 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 116 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 63 हजार 464 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरात 1405 अॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 1405 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 02 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4393 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 8,549 जणांचे लसीकरण
शुक्रवारी (दि.27) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 8 हजार 549 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 13 लाख 87 हजार 500 जणांना लस देण्यात आली आहे.
Web Title : Pimpri Corona | 173 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
SBI Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांसाठी भरती