Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 175 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : ऑनलाइन टीम – Pimpri Corona |पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. आज शहरात नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) 175 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकही मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 175 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 536 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 129 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 59 हजार 262 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 930 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 02 रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4344 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.31) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 16,484 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 10 लाख 95 हजार 540 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 175 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Maharera | ‘महारेरा’चा बिल्डरांना दणका ! पुणे जिल्ह्यातील 189 प्रकल्प ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये;
फ्लॅट बुक करताना घ्या काळजी, पाहा यादी

Child Pornography | महाराष्ट्रात Child Pornography च्या प्रकरणात प्रचंड वाढ;
धक्कादायक माहिती समोर

Vacant Posts in Army | सैन्य दलात 1 लाख 21 हजार जागा रिक्त;
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट

Assam Mizoram Border Conflict | धक्कादायक !
पायाला गोळी लागलेल्या SP निंबाळकर यांच्यावर FIR