Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 175 नवीन रुग्ण, जाणून घ्या शहरातील कोरोनाची सद्यस्थिती

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. आज शहरात नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत आढळून आली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 175 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 05 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Health Department) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 175 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 64 हजार 198 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 173 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 59 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 788 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील 05 रुग्णाच्या मृत्यूची
नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4341 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी
(दि.29) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination)
करण्यात आले आहे. तर 132 खाजगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज
दिवसभरात 11,645 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 10 लाख 73 हजार 429 जणांना लस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

IT Company | दिग्गज IT कंपनी देईल 1 लाख लोकांना नोकरी, उत्पन्नात झाली 41.8 टक्केची वाढ

Rajesh Tope | राज्यातील ‘हे’ 11 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यातील निर्बंध उठणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Corona | 175 new corona patients in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out the current status of corona in the city

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update