Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 175 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

0
60
pimpri corona | 175 patients diagnosed with corona in pimpri chinchwad in last 24 hours learn other statistics
File Photo

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या पावणे दोनशे वर पोहचली असताना ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत असल्याने अधिकच चिंता वाढली आहे. रुग्ण वाढत असताना मृत्ये प्रमाण कमी असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटल्याने सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 175 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 5690 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 175 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 23 लाख 96 हजार 851 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 79 हजार 423 जणांना कोरोनाची बाधा (Pimpri Corona) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 171 रुग्णांनी कोरोनावर मात (Recover) केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 75 हजार 160 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

सध्या शहरामध्ये 468 सक्रिय रुग्ण (Active Patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 234 रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 234 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Isolation) आहेत. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झालेली नाही. आजपर्यंत शहरात 4526 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

 

Web Title :- pimpri corona | 175 patients diagnosed with corona in pimpri chinchwad in last 24 hours learn other statistics

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी

Skin Care Tips | चेहरा साफ करताना अनेकदा लोक करतात या 5 चुका , त्वचेसाठी नुकसानदायक

Pune Crime | दुचाकीवरील 2 मुलांना चिरडून पळून गेलेल्या बस चालकाला वाकड पोलिसांकडून अटक

EWS Reservation | EWS आरक्षण उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये कायम, केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र

Housing Sales Report | 2021 मध्ये पुण्यासह देशातील ‘या’ 7 टॉप शहरांत घरांची विक्री 71% वाढली, पुण्यात 53 % वाढ; ‘एनारॉक’च्या रिपोर्टमध्ये दावा

Palghar Crime | आश्रम शाळेतील 12 वर्षाच्या मुलीला कामास बोलावून अधीक्षकाचं विकृत कृत्य, महिला कर्मचाऱ्याने पाहिलं अन्…

Dry Fruits-Immunity | ओमीक्रोनपासून वाचण्यासाठी वाढवा इम्यूनिटी, हे 3 ड्राय फ्रूट्स आहेत उपयोगी