Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 176 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. शहरातील नवीन रुग्णांची संख्या (New patient) घटली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची (Pimpri Corona) संख्या वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 176 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 176 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 70 हजार 786 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 273 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 65 हजार 453 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1338 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

 

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत.
तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4405 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.7) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 10436 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 15 लाख 51 हजार 921 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 176 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Multibagger Stock | 42 वरून 800 रूपयांवर पोहचला ‘हा’ शेयर, गुंतवणुकदार झाले मालामाल ! 1 लाखाचे झाले 19 लाख रुपये, तुमच्याकडे आहे का?

Maharashtra Lockdown | …तर संपुर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागतील; मंत्री विजय वडेट्टीवार

Pune Corporation | मनपाच्या शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची सभागृह नेत्यांकडून झाडाझडती, गणेश बिडकर म्हणाले – ‘आगामी काळात शिक्षणाचे सर्व विषय शिक्षण समितीसमोर आणावेत’