Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 184 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Chinchwad Corona) कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. शहरात मागील काही दिवसांपासून नविन रुग्णांची संख्या दोनशेच्या आत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे शहरातील अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 184 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 184 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Corona-infected patients) संख्या 2 लाख 70 हजार 970 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 128 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 65 हजार 631 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरात 1393 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

शहरामध्ये सध्या 1393 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे.
आज दिवसभरात शहरात पूर्वी मृत्यू झालेल्या 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4406 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आज (बुधवार) 7228 संशयितांची स्वॅब तपासणी करण्यात आली.
आजपर्यंत शहरामध्ये 18 लाख 02 हजार 393 प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली आहे.

 

दिवसभरात 20,421 हजार जणांना लस

बुधवारी (दि.8) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी कोविड -19 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 20 हजार 421 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 15 लाख 72 हजार 342 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 184 new patients of ‘Corona’ in the last 24 hours in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Kolhapur Crime | धक्कादायक ! पत्नीचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत 10 लाखाची मागितली खंडणी

MP Vinayak Raut | विनायक राऊतांचा राणे पुत्रांना टोला; म्हणाले – ‘टिंगू-मिंगू बडेजाव मारायला लागले’

Modi Cabinet Decisions | मोदी सरकारच्या ‘या’ मोठ्या निर्णयाने लाखो लोकांना मिळेल रोजगार, जाणून घ्या प्लॅन