Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 185 नवीन रुग्ण, 241 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri-Chinchwad) मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या (Corona) नवीन रुग्ण संख्येत वाढ होत आहे. तर कोरोनामुक्त (Recover patient) होणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. परंतु गेल्या 24 तासात शहरात बाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 185 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 185 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 61 हजार 054 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 241 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 55 हजार 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 235 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी झाले आहे. आज दिवसभरात 04 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.13) शहरामध्ये 04 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 15 खासगी कोविड लसीकरण केद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 3632 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 7 लाख 92 हजार 899 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Title : Pimpri Corona | 185 new patients of Corona in Pimpri Chinchwad

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune News | पुणे जिल्हयात सुमारे 10000 अपार्टमेंट ! आता क्षेत्रफळानुसार अपार्टमेंटधारकांना द्यावा लागणार मेंटेनन्स, जाणून घ्या

Pimpri Crime News | आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन बिल्डर मेहतासह 7 जणांवर गुन्हा दाखल; पार्किंगसाठी सोय करुन देतो सांगून केली होती फसवणूक

Pune Crime News | लग्नाच्या आमिषाने तरूणीसोबत केली ‘मज्जा’ अन् दुसरीसोबत केला विवाह, तरूणावर बलात्काराचा FIR