Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 189 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri-Chinchwad Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या हजाराच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 189 नवीन रुग्ण (Pimpri-Chinchwad Corona) आढळून आले आहेत. तर 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 189 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 63 हजार 802 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 431 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 58 हजार 670 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 796 अॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे.
आज दिवसभरात 03 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत.
तर 02 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4336 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मंगळवारी (दि.27) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 2155 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 10 लाख 44 हजार 612 जणांना लस देण्यात आली आहे.

Web Titel :- Pimpri Corona | 189 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati Crime | अमरावतीत ‘हवाला’कांड ! 2 चारचाकी वाहनांमधील 3 कोटी 50 लाखांची रोकड जप्त, 4 गुजराती व्यक्ती ताब्यात

Pune News | पुणे जिल्ह्यातील 56 हजार प्रकरणे ठेवली जाणार तडजोडीसाठी; 1 ऑगस्टला होणार्‍या लोकअदालतून निघणार निकाली

Modi Government | अधिकार्‍यांच्या कामाचा आढावा घेणार मोदी सरकार, 50 वर्षांवरील अकार्यक्षम ऑफिसरला करणार सेवानिवृत्त !