Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 204 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये 184 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद (Pimpri Corona) झालेली नाही.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 184 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 71 हजार 337 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 204 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 66 हजार 108 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरामध्ये सध्या 1 हजार 431 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामध्ये 01 रुग्ण शहरातील आहेत. तर 01 रुग्ण हद्दीबाहेरील आहेत.
आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4408 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी (दि.10) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले.
आज दिवसभरात 20 हजार 125 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 16 लाख 08 हजार 793 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | 204 corona patients discharged in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Crime News | बिल्डर निशांत कदम हत्या प्रकरण : पोलिसांनी आतापर्यंत 10 जणांच्या मुसक्या आवळल्या

Nipah Test Kit | तासाभरात निपाहची लागण झाली की नाही हे समजणार; भारतात टेस्ट किटला परवानगी

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 241 नवीन रुग्ण, जाणून इतर आकडेवारी