Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 नवीन रुग्ण, 241 रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. मागील काही दिवसांपासून नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली होती तर बरे होणाऱ्या रुग्णांच्या (Recover patient) संख्येत घट झाली. रुग्ण बरे होत असल्याने सक्रिय (Active patient) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिचंवड शहरामध्ये 228 नवीन रुग्ण (Pimpri Corona) आढळून आले आहेत. तर 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये 01 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 228 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 61 हजार 515 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 241 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 56 हजार 097 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरामध्ये सध्या 1 हजार 121 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात
शहरातील 02 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4315 रुग्णांचा
मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दि.3) शहरामध्ये 71 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने
लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर शहरातील 18 खासगी लसीकरण केंद्रावर
लसीकरण करण्यात आले. गुरुवारी दिवसभरात 10267 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 9 लाख 476 जणांना लस देण्यात आली आहे.

हे देखील वाचा

pune corporation | 23 गावांच्या विकास आराखड्याचा वाद ! विशेष सर्वसाधारण सभेत भाजपने आराखड्याचा इरादा जाहिर करण्याचा प्रस्ताव केला बहुमताने मंजूर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pimpri Corona | 228 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update