Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 40 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात (Pimpri Corona) 44 रुग्णांचे निदान झाले आहे. तर 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 4504 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 44 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 22 लाख 86 हजार 176 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 78 हजार 083 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 40 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 73 हजार 960 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. (Pimpri Corona)

शहरात 337 सक्रिय रुग्ण
शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या पाचशेच्या आत आली आहे. सध्या शहरामध्ये 337 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात 199 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 138 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 4517 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (Pimpri Corona)

 

दिवसभरात 13,237 जणांचे लसीकरण
पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत. आज (मंगळवार) दिवसभरात 13 हजार 237 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 28 लाख 09 हजार 646 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 40 patients discharged from Corona in Pimpri-Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Janhvi Kapoor | जान्हवी कपूरने सोनोरी ड्रेसमध्ये दाखवली कातिलाना फिगर, फोटोंनी लावली आग

Corporator Patil Archana Tushar | नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश ! कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत; स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

खुशखबर ! Netflix चे प्लान झाले स्वस्त ! 149 रुपयांपासून पॅकची सुरुवात, मासिक प्लान्सवर 60% पर्यंत केली ‘कपात’