Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 42 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये दैनंदिन रुग्णांची (Pimpri Corona) संख्या कमी झाली असली तरी नव्या व्हेरिएंटचे (New variant) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. शहरामध्ये गेल्या 24 तासात 39 नवीन रुग्णांचे निदान (Pimpri Corona) झाले आहे.तर 42 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आला आहे. रुग्ण बरे (Recover) होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या कमी झाली आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 6 हजार 324 संशयीतांची विविध तपासणी केंद्रावर तपासणी करण्यात आली. यामध्ये 39 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 22 लाख 99 हजार 073 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory test) घेण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 लाख 78 हजार 171 जणांना कोरोनाची लागण (Corona infection) झाली आहे. यापैकी 2 लाख 74 हजार 049 जणांनी कोरोनावर मात केली आहे. (Pimpri Corona)

 

शहरामध्ये गेल्या 24 तासात एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात आजपर्यंत 4 हजार 518 जणांचा मृत्यू झाला आहे.
सध्या शहरामध्ये 339 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये 197 जण आहेत तर 138 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

Web Title :- Pimpri Corona | 42 patients discharged from Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

WhatsApp Privacy Setting | आपल्या फोनमध्ये ताबडतोब ऑन करा WhatsApp च्या ‘या’ 5 सेटिंग, कुणीही करू शकणार नाही ‘हेरगिरी’

ABRY | 15 हजारपेक्षा कमी पगार असणार्‍यांना सरकार देतंय मोठा फायदा, योजनेत रजिस्ट्रेशनची शेवटची तारीख जाणून घ्या

Rupali Thombare-Patil | पक्षात प्रवेश करताच रुपाली ठोंबरे-पाटील यांना अजित पवारांकडून मिळालं ‘हे’ मोठं गिफ्ट