Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 44 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दैनंदिन रुग्णांची (daily patients) संख्या शंभरच्या आत आल्याने दिलासा मिळाला असताना नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात शहरात (Pimpri Corona) 40 रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 5842 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 40 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 22 लाख 07 हजार 407 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 77 हजार 544 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 44 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 73 हजार 428 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

 

शहरात 337 सक्रिय रुग्ण

शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या पाचशेच्या आत आली आहे. सध्या शहरामध्ये 337 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरात 214 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर 123 रुग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत शहरात 4510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 21,222 जणांचे लसीकरण
पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.
महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत.
आज (बुधवार) दिवसभरात 21 हजार 222 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहरात 26 लाख 03 हजार 561 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 44 patients discharged from ‘Corona’ in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये

Mumbai Crime | खळबळजनक ! गुंगीचं औषध देऊन पत्नीवर सामूहिक बलात्कार, पतीसह मित्राला अटक

Pune News | बांग्लादेश युद्धात पाकिस्तानवर भारताने मिळविलेल्या विजयाच्या 50 व्या वर्षानिमित्त ‘सुवर्ण विजय’ द्विसप्ताहाचे आयोजन – आबा बागुल