Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 61 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. दैनंदिन रुग्णांची (daily patients) संख्या शंभरच्या आत आल्याने दिलासा मिळाला आहे. असे असले तरी बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत आणि नवीन रुग्णांच्या (new patient) संख्येत चढउतार पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात शहरात (Pimpri Corona) 56 रुग्णांचे निदान झाले आहे. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे) झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने (PCMC Health Department) दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) गेल्या 24 तासात 4940 संशयित रुग्णांची (Pimpri Corona) तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 56 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजपर्यंत शहरात 21 लाख 79 हजार 609 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2 लाख 77 हजार 293 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. गेल्या 24 तासात शहरात 61 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आतापर्यंत 2 लाख 73 हजार 144 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

रुग्ण कमी होत असल्याने आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने शहरातील सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या पाचशेच्या आत आली आहे.
सध्या शहरामध्ये 373 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या 24 तासात शहरात एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
आजपर्यंत शहरात 4507 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 2371 जणांचे लसीकरण
पिंपरी चिंचवड महानगरपालीकेच्या वतीने आणि खासगी कोविड लसीकरण (Covid vaccination) केंद्रातून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे.
महापालिकेच्या 69 आणि खासगी 132 लसीकरण केंद्रावर कोविड प्रतिबंधक लसीचे डोस दिले जात आहेत.
आज (गुरुवार) दिवसभरात 2371 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहरात 25 लाख 9 हजार 012 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 61 patients discharged from Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours, find out other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ गुंतवणुकीवर मिळेल 6 पट रिटर्न, येणार आहे कंपनीचा IPO

Pune Corona | पुणे शहरात ‘कोरोना’च्या 90 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

BJP MP Heena Gavit | ‘घरकोंबड्या ठाकरे सरकारमुळे नाही, केंद्राने मदत केली म्हणून महाराष्ट्र कोरोनातून सावरला’