Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 75 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये (Pimpri Corona) नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. शहरात रुग्ण वाढत असताना बरे होण्याचे (Recover patient) प्रमाण कमी झाल्याने शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच शहरात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे (Omicron Variant) रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 75 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 6266 संशयितांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 75 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची (Pimpri Corona) संख्या 2 लाख 78 हजार 726 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 63 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 536 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

शहरामध्ये सध्या 399 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यामध्ये 242 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 157 लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4522 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 10 हजार 127 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारमध्ये 29 लाख 25 हजार 378 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 75 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या कर्वेनगर परिसरात भरदिवसा 20 वर्षीय युवकाचा तलवारीने सपासप वार करून खून; प्रचंड खळबळ

 

Gold Price Today | सोन्याच्या किमतीत घसरणीने खरेदीदारांच्या चेहर्‍यांवर समाधान, जाणून घ्या आठवडाभरातील सोने-चांदीची स्थिती

 

Pune Crime | ‘पुणे ग्रामीण’ची मोठी कारवाई ! यवत पोलिसांकडून पाटस परिसरातून 50 लाखाचा गांजा जप्त; 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक

 

Lip Care In Winter | हिवाळ्यात ‘या’ घरगुती पध्दतीनं घ्या ओठांची काळजी, फाटण्याची तर अजिबातच भिती नाही; जाणून घ्या

 

Komaki-X-One-Electric Scooter | हायटेक फीचर्ससह एका चार्जमध्ये 90 किमीपर्यंत चालते, 45 हजारांच्या बजेटमध्ये येणारी ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर