Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित (Pimpri Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्ण वाढत असताना ओमिक्रॉनचे (Omicron variant) रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये 4 ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 83 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

 

आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 5 हजार 946 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 83 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह (Pimpri Corona) आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 78 हजार 906 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 68 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 74 हजार 675 रुग्णांनी कोरोनावर (Recover patient) मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरामध्ये सध्या 437 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये 218 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 219 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच शहरातील पूर्वी मृत्यू झालेल्या एका रुग्णाचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,525 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शहरात 4 ओमिक्रॉनचे रुग्ण
पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज चार ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहे. चार रुग्णांमध्ये 2 महिला, 1 पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. चार रुग्णांपैकी 1 रुग्ण थायलंड, 1 जपान, 1 दक्षिण आफ्रिका येथून आले आहेत.तर एक रुग्ण रॅन्डम तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सर्व रुग्णांवर भोसरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दिवसभरात 8,928 जणांचे लसीकरण
आज शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 8 हजार 928 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारामध्ये 29 लाख 52 हजार 726 जणांना लस देण्यात आली आहे.

 

 

Web Title :- Pimpri Corona | 83 patients diagnosed with Corona in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक

Maharashtra Government Guidelines | थर्टी फस्टच्या पार्टी आणि कार्यक्रमांच्या पार्श्वभुमीवर राज्य गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

Maharashtra Police | मला आणि माझ्या कुटुंबाला देवेन भारतींपासून धोका; तक्रारदाराची पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी