Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 88 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाची (Pimpri Corona) दुसरी लाट ओसरत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना बरे (Recover) होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. ही शहराला दिलासा देणारी बाब आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 88 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर एका रुग्णाच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने (Pimpri Chinchwad Municipal Corporation) दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 88 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 043 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 90 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 2 लाख 71 हजार 675 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Pimpri Corona) देण्यात आला आहे.

शहरात 612 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण
शहरामध्ये सध्या 612 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शहरामध्ये रुग्णसंख्या कमी होत असताना मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात शहरातील एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून या रुग्णाच्या मृत्यूचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,487 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 2514 जणांचे लसीकरण
गुरुवारी (दि.28) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Corona) वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे. तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 2 हजार 514 जणांना लस देण्यात आली आहे. आजपर्यंत शहारामध्ये 22 लाख 76 हजार 488 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title :- Pimpri Corona | 88 patients diagnosed with corona in Pimpri Chinchwad in last 24 hours; Learn other statistics

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune NCP | पुण्यात राष्ट्रवादीकडून हवन करत आंदोलन; शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले – ‘भाजप भ्रष्टाचाराचा इतिहास रचतयं’ (व्हिडीओ)

Pune Smart City Company-ATMS | कॉंग्रेस, NCP चे काही नगरसेवक नेहमीप्रमाणे केवळ ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून आरोप करताहेत; सभागृहनेते गणेश बिडकर यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Crime | अनधिकृत बांधलेल्या फ्लॅटची विक्रीकरुन 47 लाखांची फसवणूक, कोंढवा पोलिसांकडून मजहर शेखला अटक