Pimpri Corona | दिलासादायक ! सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट, पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 33 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचा (Pimpri Corona) प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत आहे. शहरामध्ये नव्याने (New patient) आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover patient) प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे (Pimpri Corona) 33 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 01 रुग्णांच्या मृत्यूची नोंद (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) झाली आहे. गेल्या 24 तासात शहरामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri Chinchwad Municipal Corporation) वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात शहरात 33 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 लाख 76 हजार 730 इतकी झाली आहे.
त्याचवेळी शहरामध्ये 39 रुग्ण कोरोनामुक्त (Pimpri Corona) झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 2 लाख 72 हजार 526 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

शहरात 436 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

 

शहरामध्ये सध्या 436 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण (Active patient) असून त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शहरामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील कमी होत आहे. आज दिवसभरात याआधी मृत्यू झालेल्या शहरातील एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे.
गेल्या 24 तासात शहरातील एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4499 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

दिवसभरात 9,461 जणांचे लसीकरण

 

शनिवारी (दि.13) शहरामध्ये 69 ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लसीकरण (Vaccination) करण्यात आले आहे.
तर 132 खासगी लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात आले. आज दिवसभरात 9,461 जणांना लस देण्यात आली आहे.
आजपर्यंत शहारमध्ये 23 लाख 95 हजार 815 जणांना लस देण्यात आली आहे.

 

Web Title : Pimpri Corona | Comfortable! Decrease in number of active patients, 33 new patients of ‘Corona’ in Pimpri Chinchwad, know other statistics

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

MP Sujay Vikhe Patil | ‘पंकजा मुंडेंमुळे मी खासदार, माझ्यामुळे कोणाची अडचण व्हायला नको’ – खा. सुजय विखे

Multi Asset Fund | ‘या’ फंडने गुंतवणुकदारांना दिला शानदार रिटर्न ! 1 लाखांची गुंतवणूक झाली 41.46 लाख रुपये, जाणून घ्या सविस्तर

Pune schools Holiday | पुणे जिल्ह्यातील शाळांना 19 पर्यंत सुट्टी, शिक्षणाधिकारी यांची माहिती